पाचोरा तालुक्यात सट्टा-मटक्याचा सुळसुळाट; राजकीय पक्षाची चादर ओढून बेहिशोबी मालमत्ता कमावणारा ‘सट्टेवाला’ बिंदास? पोलिसांसमोर कारवाई बाबत मोठे अवाहन.

- शासनाला कुठलाही टॅक्स न भरणाऱ्या या सट्टा वाल्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.
- पाचोर्यातील अनेक दुकाने मुख्य बाजारपेठेत?
पाचोरा (जळगाव): पाचोरा तालुक्यात सट्टा, मटका, जुगार, गावठी दारू आणि लॉजिंग व्यवसायासारख्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शहरातील ‘सट्टा किंग’च्या माध्यमातून ही संपूर्ण साखळी तालुक्यात कार्यरत असून, यावर पायबंद घालणे हे पोलिसांसमोर सध्याचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. या अवैध धंद्यावाल्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पक्षाच्या चादरी ओढून कोट्यवधींचा बेहिशोबी व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे चित्र आहे. या सट्टा किंगवर कारवाई होणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार, पण कारवाई अपूर्णच!
मागील पोलिस निरीक्षकांच्या कार्यकाळात सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी सट्टा, मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांविरोधात निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही कारवाई केवळ नावापुरती होती का? असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सट्टा किंग कोण आहे? त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? आणि राजकीय संरक्षणामुळे तो का बिनधास्त आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
- पत्रकारांनीही उघड केली वास्तविकता?
पत्रकारांनी वेळोवेळी अवैध धंद्यांचा सुळसुळाट उघडकीस आणणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या आहेत. शासनानेही नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध धंद्यांबाबत प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे. तरीही, या धंद्यांवर कारवाई झाल्यावर काही तासातच हा व्यवसाय पुन्हा सुरू होतो. सट्टा-मटका चालकांकडे कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता कशी जमा झाली? त्यांचे नेमके व्यवसाय कोणते? आणि ते शासनाला कर भरतात का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे प्रशासनासाठी आवश्यक आहे.
- लॉजिंग व्यवसायावरही प्रश्नचिन्ह
सट्टा-मटक्यासह गावठी दारू आणि लॉजिंग व्यवसाय हे समाजासाठी घातक ठरत आहे. पाचोरा तालुक्यातील लॉजिंग व्यवसायात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी तपासल्या जातात का? याबाबतही शंका उपस्थित होत आहे. अशा व्यवसायांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, याकडे पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिस कारवाईची अपेक्षा
पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी कारवाया केल्या असल्या, तरी त्या पुरेशा प्रभावी ठरल्या नाहीत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. सट्टा किंग आणि त्याच्या साखळीवर कठोर कारवाई होऊन त्याला राजकीय संरक्षण देणाऱ्यांचा मंडळींनी देखील याकडे सर्वांचे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रशासनाला आव्हान
पाचोरा तालुक्यातील अवैध धंद्यांचा हा मोठे जाळे मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासनाला ठोस कारवाई करावी लागेल. यासोबतच, लॉजिंग व्यवसाय आणि इतर अवैध धंद्यांवर कडक नजर ठेवून कारवाई करण्या अपेक्षित आहे.