नगरपालिकेच्या सुरू केलेल्या विरंगुळा केंद्रात प्रमोद सोनार यांचा जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सत्कार!

पाचोरा: दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेची मासिक बैठकीत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र एम.एम. कॉलेज जवळ येथे राजाराम नागो सोनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. नवीन ज्येष्ठ नागरिक सभासदांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच ज्या सभासदांचे वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात येतात त्यांचा सुद्धा सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये अरुण नारायण जोशी,श्री दत्तात्रय सिताराम पाटील,श्रीमती सुलोचना पांडुरंग माळी,गोविंद झेंडू पाटील, पुरुषोत्तम जाधव सर, प्राध्यापक दिलीप बंधू वाणी सर यांचा समावेश करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी अमर संजीवनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कजगाव येथील सचिव श्री बी .के.पाटील सर,संचालक राजेंद्रसिंग बाबुलाल पवार तसेच विक्रम कौतिक महाजन, गोविंदा सखाराम महाजन, पृथ्वीराज हरी पाटील इत्यादी सभासद यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तद्नंतर श्रीमती सुलोचना पांडुरंग माळीताई यांनी अहिराणी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. अहिराणी गीत शेतकरी राजा भोया सादर करण्यात आले होते. यावेळी पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेने करण्यात आली. राजाराम नागो सोनार अध्यक्ष यांचे चिरंजीव श्री प्रमोद राजाराम सोनार यांना उत्कृष्ट शिलेदार उद्योजक म्हणून जळगाव या ठिकाणी लोकमत तर्फे सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा सत्कार सचिव के.एस.महाजन सर यांनी केला. अतिशय खेडीमेडीचे वातावरणात नगरपालिका अंतर्गत विरंगुळा केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.