शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ प्रदान!रोटरी क्लबचा उपक्रम

रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पाचोरा,भडगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ११ शिक्षकांना रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत हा सोहळा उत्साहात पार पडला.
- सत्कारमूर्ती शिक्षक
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी खालील शिक्षकांना ‘रोटरीचे मानचिन्ह’ देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला:
प्रा. डॉ. वासुदेव वले (उपप्राचार्य, एम एम महाविद्यालय)
श्री. राजेंद्र वाणी (माजी मुख्याध्यापक, जागृती विद्यालय)
श्री. नरेंद्र ठाकरे (मुख्याध्यापक, श्री गोसे हायस्कूल पाचोरा)
सौ. उज्वला महाजन (मुख्याध्यापिका, कन्याशाळा पाचोरा)
सौ. विद्या कोतकर (पी.के. शिंदे शाळा)
प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी (एम एम महाविद्यालय)
श्री. भावेश अहिरराव (समाज विकास विद्यालय, शिंदाड)
श्री. ज्ञानेश्वर पाचोळे (केंद्रप्रमुख, सारोळा सामनेर)
श्री. संदीप चौधरी (वरसाडे)
श्री. मृत्युन्जय शाह
श्री. देवल जोशी (लाडकुबाई विद्यालय, भडगाव)
याव्यतिरिक्त, अवयवदान पथनाट्याचे सादरीकरण करणारे कै. पी.के. शिंदे शाळेचे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका विद्या कोतकर मॅडम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
शिक्षकांना ‘समाजाचा दीपस्तंभ’
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. राजेंद्र चिंचोले (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक) यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व विषद केले. “शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे. तो विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नव्हे, तर विचारशक्ती, सर्जनशीलता आणि कौशल्ये विकसित करतो. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हे समाज प्रगतीचे चार स्तंभ असून, या सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. वंदे मातरम गीत गाऊन आनंदोत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आगामी वर्षात एकूण १५१ कार्यक्रम घेण्याचा संकल्प व्यक्त करत, रोटरीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी वंदे मातरम हे गीत गाऊन आनंदोत्सव साजरा केला. सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. वासुदेव वले आणि प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी रोटरी क्लबचे आभार मानले व कौतुक केले. मान्यवरांची उपस्थिती यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, प्रा. राजेंद्र चिंचोले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, तसेच रोटरीचे पदाधिकारी डॉ. अमोल जाधव, डॉ. पंकज शिंदे, डॉ. गोरख महाजन, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन चेअरमन डॉ. जीवन पाटील मंचावर उपस्थित होते. संजय कोतकर व डॉ. प्रशांत सांगडे यांनी सूत्रसंचालन केले.
तसेच, शिक्षण परिषदेवर निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. पंकज शिंदे आणि प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. रोटरीचे सदस्य आणि परिसरातील शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.





