पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांना “कृषीरत्न” पुरस्काराने सन्मानित! आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पुरस्कार

पाचोरा तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश जाधव यांना मधुर खान्देश वृत्तपत्राच्या वतीने “कृषीरत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. श्री. जाधव यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शेतकऱ्यांच्या योजना तसेच महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, भाजपचे नेते मधु भाऊ काटे,अनिल भाऊ महाजन,प्रदीप देसले,माजी नगरसेवक विकास पाटील, जितेंद्र जैन,मनोज शांताराम पाटीलयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराने श्री. रमेश जाधव यांच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळाली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.