पाचोरा शहरातील तलाठी कायमस्वरूपी नियुक्त करावे! हरीभाऊ पाटील यांची मागणी.

पाचोरा शहर तलाठी सजा आणि कृष्णापुरी तलाठी सजा या सजेसाठी कायमस्वरूपी जबाबदार, अनुभवी अभ्यासु तलाठ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी याबाबत हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी निवेदन दिलेले आहे. पाचोरा शहर आणि कृष्णापुरी या दोन सजा अत्यंत महत्वकाक्षी मोठ्या सजा असून त्याच सजांची टेहाळणी पाचोरा तहसिल येथे नव्याने रुजू झालेले तसेच तलाठी पदाचा परिपुर्ण अभ्यास नसलेल्या तलाठ्यांची नियुक्ती सर्वात मोठ्या सजांसाठी करणे चुकीचे होत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाचोरा तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले तलाठी हे पाचोरा आणि कृष्णापुरी या सजांवर फक्त महिना दिड महिना कार्यरत असतात त्यानंतर त्यांची बदली केली जाते याची देखील चौकशी होणे गरजेचे झाले आहे. पाचोरा शहर तलाठी सजा आणि कृष्णापुरी तलाठी सजा येथिल तलाठ्यांची दरमहा बदली करुन सरकारी दप्तर मध्ये कोणता फेरबदल करण्यात येत आहे याची देखील चौकशी करण्यात यावी व पाचोरा शहर तलाठी सजा आणि कृष्णापुरी तलाठी सजा या तलाठ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी शिकावु तलाठ्यांची नियुक्ती आपल्या हातुन होवुन पाचोरा शहरातील नागरिकांची व कृष्णापुरी य करण्याचा प्रयत्न कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न करु नये आणि वरील सजेंवरिल सतत वारंवार तलाठ्यांच्या बदल्या करण्याचा प्रयत्न करु नये ही प्रथम नम्र विनंती करुन सदरील सजावरिल सावळा गोंधळाबाबत तक्रार क्रमांक ०१ दाखल करुन विनंती करित असल्याचेही.हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी देखील मत व्यक्त केले आहे