चाळीसगाव तालुक्यातील मोठे खेडगावात माळी समाजाचे शाहीर विठु माऊलींच्या पोवाड्यांच्या माध्यमातून प्रबोधन

चाळीसगाव: मोठे खेडगाव ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे माळी समाजाच्या वतीने 11 एप्रिल 2025 रोजी महात्मा फुलेंची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्याख्यानसह जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा येथील शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांना आमंत्रित करण्यात आले होते. महाजन यांच्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या जिवनावर आधारित उपस्थित श्रोत्यांना मनोगत व पोवाडा सादर करुन समाज प्रबोधन याठिकाणी केले आहे. फक्त जयंती, पुंण्यतिथी, मिरवणूका काढून चालणार नसून प्रत्येक बहुजन समाज बांधवांना शिव, शाहू,फुले आंबेडकर,जिजाऊ,सावित्रीबाई, आई रमाई यांच्या विचारांचे ग्रंथ कथा कादंबरी पुस्तके शाळेच्या विद्यार्थ्यांना देऊन गौरव केला पाहिजे तेव्हाच ते महापुरुषांचे विचार कायम जिवंत राहातील वाचा पुस्तके उघडतील मस्तके शेतकऱ्यांचे आसूड लिहून महात्मा फुले म्हणतात माझा बहुजन समाज कसा सुखी होईल पुढे वाक्यात म्हटले आहे.
बहुजन सुखाय बहुजन हिताय. खडकाळ जमीनीत मारुनी फाळ.
उगऊनी झाड.करूनी माळ.बहुजनांची जोडूनी नाळ अशी ही महात्मा फुलेंची विचारांची माळ अशी ही शाहिरी तोफ विठ्ठल एकनाथ महाजन माऊलींच्या विचारातून कडाडली असून महाजन यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून त्यांचा सत्कार केला म्हणून सर्व खेडगाव माळी समाज बहुजन समाज बांधवांचे व कार्यकर्त्यांचे आभार महाजन यांच्यावतीने मानण्यात आले आहे.