पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन फौजदारी कायदेविषय माहितीचे सरकारी वकील रवी पाटील यांनी केले मार्गदर्शन!

पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे नवीन फौजदारी कायदेविषयी जनजागृती व मार्गदर्शन पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई- पनवेल येथील सरकारी वकील श्री रवी पाटील यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पाचोरा:भारतात १ जुलै २०२४ पासून नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत. या विषयी जनसामान्य व पोलीस खात्याला तसेच पोलीस पाटील व शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नवीन कायद्याची माहिती व्हावी यासाठी पनवेल येथील सरकारी वकील रवी पाटील यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम पाचोरा येथील नवीन व्यापारी संकुल येथे दिवाणी कायदे फौजदारी, दैनंदिन घडणारे अपघात व घटना यामध्ये नवीन आलेल्या कायद्याच्या संदर्भात माहिती व मार्गदर्शन केले आहे.

कायद्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे, संविधानात कायदा हा सर्वांसाठी समान आहे. यामध्ये समाजातील घटकामध्ये कुठलाही भेदभाव नसून कायद्याचे योग्य वापर केला तर त्याचा फायदा चांगला आहे. यावेळी पाचोरा विभागाचे डी.वाय. एस.पी. धनंजय येरुळे यांनी देखील मार्गदर्शन केले आहे.
यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे तसेच पोलीस उपनिरीक्षक शितल परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक,विविध सेवांमध्ये कार्य करणारे कर्मचारी व पत्रकार याठिकाणी उपस्थित होते.