माळी समाजाचे खरे वैभव अनिल महाजनच! न्यायालयाच्या निकालानंतर आमदार एकनाथ खडसे व भाजपच्या आमदार देवयानी फरांदेच्या शुभेच्छा!

मुंबई:महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तळागळातील कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील मूळ रहिवासी सध्या वास्तव मुंबई येथे जेष्ठ पत्रकार म्हणून मंत्रालय येथे पत्रकारिता तसेच समाज कार्यात नावलौकिक झालेले अनिल बाबूलाल महाजन हे अनेक वर्षांपासून माळी तसेच बहुजन समाजासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करत होते.

या कार्याची दखल घेत समाजाने त्यांना राज्यातील सर्वात मोठी माळी समाजाची संघटना असलेल्या महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. परंतु समाजातील काहींनी याबाबत न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने सामाजिक कार्याचे दखल घेत अनिल महाजन हेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अध्यक्ष राहतील असे स्पष्ट नमूद केले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार एकनाथरावजी खडसे त्याचबरोबर भाजपच्या नाशिक येथील आमदार देवयानी फरांदे यांनी देखील त्यांना पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तर माळी समाज नव्हे तर इतरही समाजातील मोठ्या नेत्यांच्या शुभेच्छा मेसेज व कॉल करून मिळाल्या आहेत.