नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी सायबर सेक्युरिटी बाबत प्रशिक्षण


पाचोरा येथील ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“देशात डिजिटल क्रांती झाली घरोघरी डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली, डिजिटल शिक्षण देऊया भारताला जगात महासत्ता बनवूया” डिजिटल शिक्षण हि काळाची गरज आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हें समोर येत आहे. याबाबत अजूनही महिलांमध्ये अनभिज्ञता आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जनजागृती केली जात असली तरी अजूनही महिलांना याबाबत पुरेसे ज्ञान नाही. यासाठी संस्था सायबर लर्निग कोर्सच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
” Cyber Security Professional Basic Online Cours” हे प्रशिक्षण मोफत देत आहे. या कोर्सचा कालावधी 10 दिवस असून महिलांना याठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता सातवी पास ते पुढिल असून वय मर्यादा 14 वर्षा पासून पुढील आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी शुल्क हे 50 /- रु मात्र असे ठेवण्यात आले आहे.

कोर्सच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड,शैक्षणिक पुरावा,दोन पासपोर्ट फोटो लागणार असून सहभागी प्रत्येक महिलेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी सायबर सेक्युरिटी कोर्स चे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विधी सेवा समिती व पाचोरा वकिल संघ यांच्या मार्फत विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रा. सुनिता गुंजाळ मांडोळे, सौ ललिता पाटील, डॉ मुकेश मैनाव हे महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष दिलीप ओंकार वाघ, चेअरमन संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन व्हि टी जोशी. सौ. रेखा साळुंखे सहायक उपविभागीय अधिकारी पाचोरा, डॉ. सुजाता सावंत पशुधन विकास अधिकारी पाचोरा, प्राचार्य डॉ.शिरीष. डी पाटील, उप प्राचार्य डॉ वासुदेव वाले, उप प्राचार्य डॉ. जे व्हि. पाटील, यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी महिला व मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन चे चेअरमन गोकुळ सोनार व एस एस एम एस महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सौ. जयश्रीताई वाघ कॉलेज प्रा. यांनी केले आहे. प्रशिक्षण हे दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे.
१) नेटवर्क अकॅडमी प्रकाश टॉकीज बाजूला जेडीसीसी बँकेच्या समोर देशमुख वाडी पाचोरा फोन नंबर 02596-240222
२)एस एस एम एम कॉलेज कम्प्युटर डिपार्टमेंट भडगाव रोड पाचोरा मोबाईल नंबर सागर सर 9422094522 प्रा.अक्षय शेंडे सर 8788019266 प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

दिनांक व वेळ दि.०8 मार्च २०२५, मंगळवार रोजी वेळ : ०९:00 स्थळ :I.C.T. सभागृह, मुख्य इमारत, भडगाव रोड, पाचोरा


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button