पाचोरा:पिंपळगाव हरेश्वर येथे भाजपाची विकसित भारत संकल्प सभा उत्साहात संपन्न

पाचोरा, दि. १९ जून २०२५ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या विकसित भारत संकल्पना सभेचे आयोजन पिंपळगाव हरेश्वर, नगरदेवळा मंडळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या सभेला माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, मधुभाऊ काटे, सुभाषभाऊ मुंडे, शिवदास तात्या पाटील, कैलास आप्पा चौधरी, शरद सोनार, नरेंद्र पाटील, शोभाताई तेली, जगदीश तेली, किसन पाटील, ईश्वर पाटील, वसंत गीते, उस्मान मामू, अक्षय जैस्वाल, हिमत नाना, प्रमोद सोमवंशी, विश्वनाथ सोमवंशी, नंदू सोमवंशी, गोविंद शेलार, कांतीलाल जैन यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर विकासकामांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेत उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार आणि गावागावात विकासाच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला. या सभेने कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचे संचार केले असून, विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.