पाचोऱ्यात भाजप सदस्य नोंदणी अभियान माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न!

मधुर खान्देश वृत्तसेवा| दि. २१ जून २०२५
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या नव्या उंची गाठणाऱ्या यशस्वी वाटचालीला यंदा अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने देशभरात “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा शहर शाखेच्यावतीने दि. २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, शहरात सदस्य नोंदणी अभियानाचे भव्य आयोजन करण्यात आले. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ होते. त्यांच्या हस्ते सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आला असून कार्यक्रमास पाचोरा शहर व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पाचोरा शहराच्या सभासद नोंदणीच्या इतीहासात ऐतिहासिक गर्दी प्रथमच दिसुन आली
या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना “८८ ०००० २०२४” या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सदस्य होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात युवक, महिला, व्यापारी, शेतकरी, विविध समाजघटक भाजपाशी जोडले जात आहेत
या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विशेषतः संजय वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे,व्ही. टी. जोशी, सुभाष पाटील, प्रदीप पाटील,डॉ. शांतीलाल तेली, रमेश वाणी , नंदू सोमवंशी, शिवदास पाटील, वासुदेव माळी, दादासो. सुदाम वाघ, हारूण देशमुख,सतीश चौधरी, अशोक मोरे,शरद पाटील, भूषण वाघ, निलेश पाटील, सुरज वाघ, बंटी महाजन ,अमोल ठाकूर,विनोद पाटील, भगवान मिस्तरी, बंडू नाना, अॅड. ललित सुतार, सुनील पाटील, हरीश पाटील, अनिल पाटील, वाजिद बागवान, ए. जे. महाजन, बंटी पाटील, गणेश पाटील, विशाल पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. महिला नेतृत्वाचा सशक्त प्रत्यय देणाऱ्या ताईसो. सुचेता वाघ, ताईसो. ज्योती वाघ, ताईसौ. प्रमिला वाघ, ताईसो. सरला पाटील, ताईसो. जयश्री मिस्त्री, ताईसो. सुरेखा पाटील, ताईसो. दिपमाला पाटील यांनी विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मार्गदर्शन करताना मा. दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले की, “देशाचे नेतृत्व करीत असलेले मा. नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताने संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ही प्रगती आणखी गती घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने भाजपच्या विचारधारेशी जोडले गेले पाहिजे. सदस्य नोंदणी हे केवळ औपचारिक कार्य नसून, देशहिताच्या दिशेने उचललेले एक सशक्त पाऊल आहे.”