जळगाव जिल्हा
पाचोऱ्यात फुले स्मारकावर माळी समाजाच्या वतीने सावित्रीबाईंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

आज दि. 10 मार्च 2025 रोजी पाचोरा शहरातील स्टेशन रोडवरील नव्याने उभारलेल्या फुले स्मारकावर समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी सावित्रीबाईंच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी जय ज्योती जय क्रांतीचा नारा लावत समाजामध्ये क्रांतीची मशाल रुजवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करत समाजामध्ये महिलेचे स्थान किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील माल्यार्पण करून समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी पाचोरा येथील माळी समाज पंच मंडळाचे सन्माननीय सदस्य, पदाधिकारी,अध्यक्ष कार्याध्यक्ष, सचिव त्याचबरोबर समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.


