पाचोरा पोलीस वसाहतीच्या इमारतीचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न! पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती

पाचोरा येथील पोलीस कवायत मैदान येथील पोलीस निवस्थानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे रक्षण केले जाते आणि रक्षण कर्त्या पोलीस बांधवांच्या व्यथा देखील सरकारने समजून घेतल्या पाहिजे.

त्या अनुषंगाने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी पोलीस बांधवांच्या घराची दुर्दशा लक्षात घेता मागील दहा वर्षांपासून पाचोरा येथील पोलीस कवायत मैदानावरील पोलीस लाईन येथे नव्याने पोलीस वसाहत बांधण्याससाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता या बांधकामासाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पोलिस बांधवांना न्याय दिला आहे.

आज दि. 11 मार्च 2025 रोजी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या भूमिपूजन प्रसंगी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे,तहसिलदार विजय बनसोडे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे,पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी,प्रकाश चव्हाणके, सुनील पाटील तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी, होमगार्ड या ठिकाणी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मधुभाऊ काटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, किशोर बारावकर,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष सुमित सावंत यांची उपस्थिती होती.
