एम.टी.एस परीक्षेत नवीन प्राथमिक शाळेचे यश! आयुष मुकेश तुपे नामक विद्यार्थी प्रथम.

नुकत्याच झालेल्या केंद्र स्थरावरील MTS परीक्षेत नविन प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. पाचोरा येथील नविन प्राथमिक शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवलेल्या होता. यामध्ये चि. आयुष मुकेश तुपे हा विध्यार्थी केंद्र स्तरावर प्रथम आलेला आहे. तर शाळा स्तरावर कु. तन्वी समाधान पाटील या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मागास विद्यार्थी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्री. उत्तम शंकर राठोड व कै.ताराचंद नाईक शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष श्री. दरबार उत्तम राठोड आणि संचालक श्री. राजू उत्तम राठोड आणि नवीन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, श्री. सुनील रामलाल पाटील यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. तर यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. मोरे सर, श्रीमती. तायडे मॅडम व श्री. महेश पाटील सर यांनी परिश्रम घेतले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.