हर दिवाली मे है अली, हर रमजान मे है राम! पाचोऱ्यात हिंदू महिलेचे मुस्लिम युवकांने वाचवले प्राण

वृत्तसंकलन:राहुल महाजन,संपादक | मधुर खान्देश
आपण अनेक वेळा हिंदू मुस्लिम वाद झाल्याच्या बातम्या बघितल्या, ऐकल्या किंवा वाचल्या असतील परंतु संपूर्ण विषयाला पाचोऱ्याच्या या मुस्लिम बांधवांनी पूर्णविराम लावत ईदच्या पवित्र महिन्यामध्ये पुण्य कमविण्याचे काम या ठिकाणी केले आहे. समाजात आजही माणुसकी जिवंत असून याचे उदाहरण बघायला मिळाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सकाळी दहा वाजेच्या सुमारास जळगाव-पाचोरा हायवेवरील बिल्दी गावाच्या बहुळा धरणामध्ये अचानकपणे एका 55 वर्षीय महिलेने पुलावरून पाण्यात उडी मारली होती. सदर घटना परिसरातील आजूबाजूच्या लोकांना लक्षात आल्यावर त्या ठिकाणाहून बांधकाम कामावर जात असलेल्या पाचोरा बाहेरपुरा परिसरातील रहिवासी असलेले हुसेन दादा यांचा पुतण्या वसीम शहा या मुस्लिम बांधवांने उपवास असल्यावरही क्षणाचाही विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली. त्या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

सदर महिलेला पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यांच्या पोटातील पाणी देखील त्या ठिकाणी काढण्यात आले होते मात्र सदर महिलेची प्रकुती खराब असल्याने तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या ठिकाणी रुग्णवाहिका चालक मनोज पाटील,किशोर लोहार, हुसेन शहा,खेडगाव नंदीचे येथील लाला जुम्मा पिंजारी त्याचबरोबर गोराडखेडा येथील सरपंच मनोज आप्पा पाटील मधुर खान्देश चे संपादक राहुल महाजन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर विजय पाटील व नर्सच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी जय मल्हार रुग्णवाहिकेने विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले होते. सदर महिलेवर तात्काळ डॉ.सागर गरुड यांनी वैद्यकीय उपचार केले असून सदर महिला सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.