क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात गोळीबार! बस स्टॅन्ड परिसरात एकाचा जागीच मृत्यू; राऊंड वर राऊंड फायर

पाचोरा, दि. ४ जुलै २०२५: पाचोरा शहरातील बस स्टॅन्ड परिसरात आज सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत शिवाजीनगर परिसरातील आकाश मोरे उर्फ सँडी जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब घोलप यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
घटनास्थळावरती फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून गुन्ह्याची चौकशी सुरू आहे.