पाचोरा जवळील सारोळा येथील शनीधाम उत्साहाला सुरुवात!

पाचोरा शहरातील जवळ असलेल्या सारोळा ते मोढांळा रस्त्यावरील प्रसिद्ध असलेल्या शनीधाम मंदीराच्या यात्रोत्सव उत्साहाला आज दि. २६ मार्च पासुन सुरुवात होत असुन तयारी पुर्ण झाली आहे.

शनीधाम मंदीराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि. २६ मार्च पासुन ते २९ पर्यंत किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दि २६ रोजी ते २९ पर्यंत सकाळी ११ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत जेवणरुपी प्रसाद त्यानंतर रात्री ८ ते १० किर्तनाचा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रोज नवीन प्रसिद्ध किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. २६ रोजी सार्वेकर ह.भ.प. सुरेश महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे तर दि.२७ रोजी दोंडाईचाकर ह. भ. प.रविकिरण महाराज, दि. २८ रोजी कंचनपुर चे ह.भ. प . दिनेश महाराज, दि. २९ सकाळी किर्तनाचा कार्यक्रम असुन सकाळी ९ ते ११ वरसाडेकर ह. भ. प.गजानन महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसाद दुपारी १२ ते ३ होणार आहे. याच दिवशी यात्रोत्सव होणार आहे.
दि. २९ रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत शनीधाम यात्रोत्सवा निमित्ताने गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व आरोग्याच्या तपासणी आणि उपचार मोफत होणार आहे. या शिबिराचा आणि किर्तनाचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भरत महाराज आणि शनिधाम मंदीर विश्वस्त यांनी केले आहे.