जळगाव जिल्हाताज्या बातम्याराष्ट्रीय
महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीचा बोस्टन येथील NLC भारत ग्लोबल लेजिस्लेटिव्ह समिटमध्ये सहभाग! पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील यांनाही संधी

बोस्टन, अमेरीका – पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांनी बोस्टन येथे आयोजित NLC भारत ग्लोबल लेजिस्लेटिव्ह समिटमध्ये सहभाग घेतला. भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचा आणि महाराष्ट्रातील विकासदृष्टीचा जागतिक व्यासपीठावर प्रचार करताना त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आणि देशाचा गौरव वाढवला.
“हा केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. “पाचोरा-भडगावच्या जनतेचा आवाज म्हणून, भारतीय लोकशाहीच्या मूल्यांची आणि आमच्या भागातील प्रगतीची मांडणी करताना मला अभिमान वाटतो. ही उपस्थिती म्हणजे महाराष्ट्र आणि देशाच्या लोकशाही समृद्धीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
या समिटमधील त्यांचा सहभाग महाराष्ट्राच्या विकासाला आणि जागतिक स्तरावरील भारतीय लोकप्रतिनिधींच्या योगदानाला अधोरेखित करत आहे.






