आमदार किशोर पाटील यांना मातृशोक! सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व. ग.भा नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुखद निधन झाले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शोकसभेचे आयोजन दिनांक 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पाचोरा शहरातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थाना जवळील शिवतीर्थ, चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्री 8 वाजता त्या ठिकाणी ह.भ.प समाधान महाराज भोजेकर यांचा कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर 08 मार्च 2025 रोजी सकाळी ह.भ.प गोविंद महाराज वरसाडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व सकाळी साडेदहा वाजता उत्तर कार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सदर सर्वपक्षीय लोकसभेला उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवसेना युवा सेना महिला आघाडी पाचोरा भडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.