पाचोरा नगरपालिकेच्या वतीने सन 2025-26 च्या वित्तीय वर्षासाठी अंदाज पत्रक सादर!

सन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी अंदाज पत्रक रक्कम रु. २५५ कोटी ५९ लक्ष २ हजार ३४२/- मात्रचे सादर करुन रक्कम रु. ८ लक्ष १३ हजार १४७/- शिल्लकेचे असुन अंदाजपत्रकात नगरपरिषद लेखा संहिता तसेच अधिनियमाप्रमाणे आवश्यक त्या सर्व तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात नगरपरिषद निधी तसेच केंद्र व राज्य शासनामधुन विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. नगरपरिषदेस प्राप्त होणारे महसुल, अनुदाने व योजनांमधुन प्राप्त होणा-या निधीचा पुर्णपणे उपयोग होईल या दृष्टीने अंदाजपत्रकात तरतुदी नमुद करण्यात आलेल्या आहेत.
शहरातील विविध भागात रस्ते, गटारी, पथदिवे, बगीचे, फुटपाथ, ओपन जिम, वाचनालय या गोष्टींचा विचार करुन सदर बाबींचा अंदाजपत्रकात खालील प्रमाणे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
१) शहरात विविध भागात राज्यस्तर नगरोत्थान (DPR) अंतर्गत नविन रस्त्यांकरीता १०० कोटी मात्रची तरतुदी केलेली आहे.
२) दलित वस्ती योजना सुधारणा अंतर्गत कामे करीता १० कोटी मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
३) जिल्हास्तर नगरोत्थान अंतर्गत विविध विकास कामांकरीता १० कोटी मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
४) दलितत्तेर वस्ती योजने अंतर्गत प्राप्त निधी मधुन कामे करणेकरीता ५ कोटी मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
५) नगरपरिषदेची नविन प्रशासकिय इमारत बांधकाम करीता २० कोटी मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
६) भुयारी गटार टप्पा क्र. २ करीता प्राप्त निधीमधुन ३५ कोटी तरतुद केलेली आहे.
७) शहरातील महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत १० लक्ष मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
८) शहरातील आर्थिक दुर्बल घटक करीता योजने अंतर्गत १० लक्ष मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
९) शहरातील दिव्यांग बांधवांनासाठी रक्कम रु. १२ लक्ष मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
१०) शहरातील नागरीकां करीता पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करणेकामी अमृत २.० अंतर्गत ३५ कोटी मात्रची तरतुदी करण्यात आलेली आहे.
तरी सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाचे अंदाजपत्रकात कोणताही कर व दरवाढ करण्यात आलेली नाही खर्च वजा जाता रक्कम रु. ८,१३,१४७/- लक्ष मात्र शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे.