रावेर लोकसभा अंतर्गत पिंप्री अकराऊत (मुक्ताईनगर) येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.सी.आर.पाटील मार्फत सीएसआर फंड अंतर्गत तलाव दुरुस्ती व खोलीकरण कामाचा शुभारंभ

● जलसंचय जन भागिदारी: भारतातील पाणी शाश्वततेसाठी समुदाय चलित मार्ग – केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे

देशाला पाणीटंचाई आणि व्यवस्थापनाशी संबंधित वाढत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याने भारतात जलसंचय हे राष्ट्रीय प्राधान्य बनले आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी गुजरात मधील सुरत येथे “जल संचय – जन भागिदारी” उपक्रम सुरु केला, जो या आव्हानांना तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून रावेर लोकसभा अंतर्गत पिंप्री अकराऊत (मुक्ताईनगर) येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.सी.आर.पाटील जी मार्फत पाझरतलाव दुरुस्ती व खोलीकरण करणेसाठी रु.११ कोटी सीएसआर निधी उपलब्ध करण्यात आलेला असून, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याहस्ते आज सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ने जलशक्ती अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) आणि अटल भूजल योजना यासह अनेक कार्यक्रम राबविण्यात येत असून, ज्यांचा उद्देश पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आहे. हे सामूहिक प्रयत्न प्रभावी भागीदारी, शाश्वत पद्धती आणि व्यापक जागरूकता याद्वारे भारतासाठी पाणी-सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतात.
“जागतिक जल दिन” दि.२२ मार्च रोजी सदर कामास सुरवात होणार असून, पावसाळा सुरु होण्याच्या आधी काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये पाझर तलावाचे विशेष दुरुस्तीकरण, नाला खोलीकरण व रुंदीकरण आणि उंची वाढवून साठवण क्षमता वाढवणे अशी कामे करण्यात येणार असून, यामुळे पिंप्री अकराऊत गावासह परिसरातील ४-५ गावांना याचा लाभ होणार आहे.
यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.सी.आर.पाटील व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह श्रीमती गंगाताई पाटील, श्री.के.व्ही.राव, श्री.क्रिस कुमार एन, श्री.अविनाश शर्मा, श्रीमती क्षिप्रा शुक्ला, श्री.उदय चौधरी, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद तसेच भाजपा जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.