पाचोरा नगरपालिकेच्या विकासकामासंदर्भात आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न! शहराची हद्द वाढविण्यावर चर्चा

मंजूर कामे मार्गी लावा-आ. किशोर पाटील यांचे आदेश
पाचोरा शहरातील चालू असलेल्या विविध विकास कामासंदर्भात आ. किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील विविध महत्वाच्या मुद्यावर आढावा बैठक घेण्यात आली असून मजूर कामे लवकरात लवकर मार्गी लावावेत अशा सूचना आ. पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
त्याच बरोबर मंजूर कामांना सुरुवात करावी तसेच विविध मुद्यावर विभागनिहाय बैठक घेऊन पाणीपुरवठा संदर्भात नियोजन करून प्रश्ण मार्गी लागावा असे आदेश आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले तसेच नगरपालिकेच्या सफाई कामगार वारसा हक्काने कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे. व येत्या काळात जारगाव, पुनगाव, महादेवाचे बाबरूड, अतुलीं शिवारातील पाचोरा शहराला लागून असलेला काही भाग भविष्यात पाचोरा नगरपालिकेत घेता येईल का या संदर्भात बैठक घेण्यात आली असून यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे.
