जळगाव जिल्हा
भुसावळ शहरातील जामनेर रोड येथे दुकानांना आग लागून नुकसान झालेल्या घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट…

भुसावळ शहरातील जामनेर रोड सिंधी कॉलोनी समोरील भावना बार्बर शॉप, बालाजी नाश्ता सेंटर आणि डॉ.विद्याधर भोळे यांचे समर्थ क्लिनिक यांना रात्रीच्या सुमारास जवळजवळ 3.30 वाजता शॉटसर्किटमुळे आग लागून खूप आर्थिक नुकसान झाले असता आज सकाळी घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन पाहणी केली.

तसेच नुकसानग्रस्त दुकानांच्या मालकांना भेटून घटनेची माहिती घेतली व स्थानिक प्रशासनास पंचनामा करून संबंधितांना योग्यती मदत मिळवून देणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सूचना केल्या.