पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प; भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

जळगाव | पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत औषधी व वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री
गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या वेळी जळगाव रेल्वे स्थानकावर भाविकांची आरोग्य तपासणी व प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. कार्यक्रमास गुलाबरावजी पाटील साहेब तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्रजी गवळी, युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा व वैद्यकीय मदत कक्षाच्या टिमने वैद्यकीय सेवा कार्य पार पाडले.यावेळी दिपक पाटील, चेतन तंबोली, धिरज राठोड, अनिकेत बोराडे, प्रदीप पारधी, दिपक माळी,भाग्येश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अनेक भाविकांना प्रवासपूर्वी आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जनसेवेचा शिवसेनेचा ध्यास या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाला.