जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण
पाचोरा-भडगाव विधानसभेत शिवसेना कार्यकर्त्यांना नवीन जबाबदाऱ्या; हडसनचे किरण पाटील यांची उपतालुका प्रमुखपदी निवड

पाचोरा, दि. 25 ऑगस्ट 2025: पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. यावेळी पाचोरा तालुक्यातील हडसन येथील किरण पाटील यांची शिवसेना कुरंगी बांबरुड जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते किरण पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.






