नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्या

पाचोऱ्यात महात्मा फुले जयंतीचा जल्लोष; आमदार किशोर पाटील यांची अध्यक्षपदी एकमताने निवड


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. ६ एप्रिल २०२५ – येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समिती (पाचोरा) यांच्या बैठकीत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे, विद्यमान आमदार यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार आमदार किशोर आप्पा पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड सर्व सामाजिक बहुजन संघटनांच्या वतीने करण्यात आली असून, त्यांचे सर्व बहुजन संघटनांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली असून सकाळी स्मारकाजवळ पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले जाईल. संध्याकाळी मिरवणूक आयोजित करण्यात आली असून, ती कृष्णापुरी येथून निघेल आणि जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे स्मारकापर्यंत जाऊन सांगता होईल.

या कार्यक्रमाला बहुजन समाजातील सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे बहुजन संघटनांकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश या निमित्ताने पाचोऱ्यात पोहोचवला जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button