पाचोरा येथे तापी जनविकास पर्यावरण संस्थे तर्फे गणेश मंडळाना ढाल वितरण सोहळा!

दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी पाचोरा येथे गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था, पाचोरा भडगाव संस्थेतर्फे पर्यावरण रक्षण व संवर्धन, लोकसंख्या नियंत्रण, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, देहदान व अवयव दान या विषयांवर उत्कृष्ट आरास देखावे सादर केलेल्या गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात ढाली देण्यात आल्यात. ‘स्त्रीभ्रूण हत्या विरोध’ या विषयावरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा नगर यांना सौ. उज्वला महाजन, अशोक महाजन यांच्या हस्ते देण्यात आली.’लोकसंख्या नियंत्रण’ या विषयावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा नगर यांना आनंद नवगिरे यांच्या हस्ते देण्यात आली. ‘अवयव दान व देहदान’ या विषयावरील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा नगर यांना प्राचार्य डी. एफ. पाटील सर यांच्या हस्ते देण्यात आली. श्री.गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान संत गाडगेबाबा नगर येथील रमेश गवळी, संजय पाटील, सचिन जाधव, शंभू झांजोटे, दिवाकर सुरवाडे, अक्षय घोडके, कृष्णा व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृषाली गोकुळ चव्हाण (मुंबई) या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद नवगिरे यांनी केले. या प्रसंगी गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष व्ही. टी. जोशी, शीला पाटील, उज्वला महाजन, विद्या कोतकर, प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, नयना कापुरे यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उज्वला महाजन यांनी केले, तर आभार वर्षा राठोड यांनी मानले.