जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची आई वडिल कुटुंबासह चार धाम यात्रा पूर्ण! उद्या पाचोऱ्यात स्वागत

पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले सध्या मुंबई येथे व्यवसाय निमित्ताने वास्तव्यास असलेले अनिल महाजन यांनी त्यांच्या कुटुंबासह आणि आई-वडिलांसोबत जगन्नाथ पुरी, गंगासागर ही शेवटची चार धाम तीर्थयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मागील चार वर्षापासून सुरू असलेला हा चार धाम तीर्थ यात्रेचा प्रवास १ एप्रिल ला पूर्ण झाला आहे. अनिल महाजन हे वरिष्ठ पत्रकार (मंत्रालय, मुंबई) तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष असून यांनी या यात्रेत सर्व सुख-सुविधांचा अनुभव घेतला आहे ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासनाने त्यांना मोलाचे सहकार्य केले आणि दोन्ही ठिकाणी व्हीआयपी प्रोटोकॉल अंतर्गत उत्तम दर्शनाचा लाभ मिळाला.
चारधाम पैकी शेवटच्या असलेल्या एक दाम म्हणजेच पुरी आणि गंगासागर या यात्रेत प्रशासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच गंगासागरला जाण्यासाठी पश्चिम बंगाल प्रशासनाने विशेष बोट आणि प्रोटोकॉलची व्यवस्था करण्यात आली होती. अनिल महाजन यांच्या राष्ट्रीय स्तरावरील मित्रपरिवार आणि शासकीय-राजकीय संपर्कांचा या यात्रेत मोठा उपयोग झाला. त्यांनी आपल्या सर्व मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
ओडिशा प्रशासन आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने यात्रेदरम्यान संपूर्ण काळजी घेतल्याने ही यात्रा कोणत्याही अडचणीशिवाय आनंदात पार पडली. या यशस्वी तीर्थयात्रेसाठी श्री अनिल महाजन यांनी दोन्ही राज्य सरकारांचे आभार मानले. ही एक अविस्मरणीय आणि सुखद अनुभव देणारी यात्रा ठरली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.



