पाचोऱ्यात मधुर खान्देश वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य स्नेह मेळावा! आमदार किशोर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार

पाचोरा, दि. ४ एप्रिल २०२५ रोजी पाचोरा शहरात ‘मधुर खान्देश’ या वृत्तसंस्थेचा वर्धापन दिनानिमित्त एका भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह पाचोऱ्यातील विविध राजकीय नेते, प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा स्नेह मेळावा ‘मधुर खान्देश’ वृत्तपत्राच्या स्थानिक पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला असून, यानिमित्ताने सामाजिक, राजकीय आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत. कार्यक्रमात वृत्तपत्राच्या प्रवासाचा आढावा घेण्यासह विविध मान्यवरांचे मनोगत आणि सत्कार समारंभ होणार आहे. आमंत्रित मान्यवरांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल महाजन यांनी आमंत्रण दिले आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत पाचोरा तालुक्यातील राजकीय नेते पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये प्रांत अधिकारी भूषण अहिरे व विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दोन विशेष पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे सदर पुरस्काराबाबत संपूर्ण पाचोरा शहरासह तालुक्यातील उत्सुकता लागली आहे.