ब्रेकिंग न्यूज: पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची विधानसभा पावसाळी अधिवेशन 2025 साठी “तालिका अध्यक्ष” म्हणून निवड; पत्रकार बांधवांना दिल्या शुभेच्छा

पाचोरा, दि. 30 जून 2025: विधानसभा पावसाळी अधिवेशन 2025 च्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची “तालिका अध्यक्ष” म्हणून निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत जाहीर घोषणा केली. या निवडीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या प्रसंगी पाचोरा येथील प्रांत अधिकारी भूषण अहिरे, मधुर खान्देश वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन तसेच पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, सुनील पाटील, निखिल मोर, जावेद शेख यांच्यासह पाचोरा येथील पत्रकार बांधवांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही निवड पाचोरा-भडगावच्या जनतेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या नवीन जबाबदारीमुळे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाला आणि अनुभवाला विधानसभेत अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.