नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

जेष्ठ पत्रकार सचिन दादा सोमवंशी यांची जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी सचिन सोमवंशी निवड!


Advertisements
Ad 4

पाचोरा : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढणारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकार संघ असुन या पत्रकार संघाच्या प्रत्येक तालुक्यात विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वात जुनी पत्रकार संघटना आहे. या पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी श्री. सोमवंशी नेहमी लढत असतात यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा पत्रकार संघांच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या ३० वर्षापासून पाचोरा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यात पत्रकारीता क्षेत्रात सोमवंशी यांचे नाव घेतले जाते. जे पत्रकार पाचोरा तालुका पत्रकार संघाचे सदस्य होतील त्यांचा सन्मान जपणे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे माझे कर्तव्य आहे असे सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button