पाचोरा सह दुय्यम निबंधक कार्यालयात मागील आर्थिक वर्षात झाली ८ हजार ८५२ दस्त नोंदणी! कोट्यवधींचा महसूल प्राप्त

मधुर खान्देश वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या पाचोरा शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग – २ कार्यालयात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत खरेदी विक्रीचे तब्बल ८ हजार ८५२ दस्त नोंदणी झाल्याची माहिती सहा दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळाली आहे. यातुन तब्बल १५ कोटी ६९ लाख ५५ हजार ९९० इतका महसूल जमा झाला आहे. पाचोरा येथे सह दुय्यम निबंधक वर्ग – २ कार्यालय असुन पाचोरा शहरासह तालुक्यातील सुमारे १०० गावांशी या कार्यालयाशी जोडलेला असून या कार्यालयात सर्व प्रकारचे प्लॉट,घर,शेती,जमीन खरेदी व विक्रीचे दस्त नोंदणी ही पारदर्शकतेने केली जाते. शेत जमिन, घरे, एन. ए. झालेले प्लाॅट यांची या कार्यालयात खरेदी व विक्रीचे व्यवहार पार पडतात. मध्यंतरीच्या काळामध्ये साईट बंद चालू होत असल्याने अनेकांचे व्यवहार उशिरा पर्यंत होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु आता मात्र खरेदी विक्री व्यवहार सुरळीत होत असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग – २ अधिकारी एस. एस. भारस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यालयात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात तालुक्यातील तब्बल ८ हजार ८५२ खरेदी व विक्रीचे दस्त नोंदविण्यात आले असुन यातुन नोंदणी फी व मुद्रांक शुल्क मिळुन १५ कोटी ६९ लाख ५५ हजार ९९० रुपये महसूल मिळाला आहे.