नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात महात्मा फुले जयंती निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण!


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. 11 एप्रिल 2025: शहरात आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्ताने स्टेशनरोड येथील फुले स्मारकावर सकाळी 10:30 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील त्याचबरोबर माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फुले स्मारकावर प्रतिमा पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे असून या कार्यक्रमात आमदारांसह माळी आणि बहुजन समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाज परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर मान्यवरांनी प्रकाश टाकला असून उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत, त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आमदारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमात सामाजिक समता आणि एकतेचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा देत, समाजातील सर्व स्तरांवर त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. सायंकाळी पाचोरा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात कृष्णापुरी पासून ते फुले स्मारकापर्यंत निघणार असून या जयंती उत्सवामध्ये तमाम समाज बांधवांनी व बहुजन समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मधुर खान्देश वृत्तपत्राच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलेले फोटो या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button