शिवसेना पक्षात ‘धनुष्यबाणा’ची ताकद वाढली: संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश!

पाचोरा-भडगाव: पाचोरा भडगाव तालुक्याचे लाडके आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवरील आणि नेतृत्वावरील दृढ विश्वासामुळे, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आणि माजी उपशहर प्रमुख सचिन पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत हाती ‘शिव धनुष्यबाण’ घेतले आहे. या प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढली आहे. “घरोघरी धनुष्यबाण चिन्ह पोहोचवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार!”
यावेळी बोलताना, शिवसेना पक्षात प्रवेश करणारे गणेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आम्ही लाडके आमदार आप्पांसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत. शहरात घरोघरी धनुष्यबाण चिन्ह पोहचवून जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगर अध्यक्षा कशा निवडून येतील यासाठी अहोरात्र प्रयत्न करू.” आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांनी प्रभावित होऊनच आपण हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
गणेश पाटील आणि सचिन पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि सक्रिय नेत्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठे बळ मिळणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या येण्यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






