पाचोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.

पाचोरा, दि. १४ एप्रिल २०२५: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पाचोरा येथे सकाळी १०:३० वाजता अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी भूषण अहिरे, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करत अभिवादन करण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या तत्त्वांचा आजच्या काळातही अवलंब करण्याचे आवाहन केले. डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्ताने पाचोरा शहरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,महात्मा ज्योतिराव फुले स्मारक त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले आहे.






