पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक!

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा तालुका येथील नाही शिक्षण संस्था संचलित श्री पंडितराव परशुराम शिंदे माध्यमिक विद्यालय येथील शिक्षिका सौ.अल्पा अमरीश कोटेचा व श्रीमती कल्पना ज्ञानेश्वर पाटील यांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे
ऑनलाइन शिक्षणाला आजच्या आधुनिक काळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक, आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे देवाण-घेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि नियंत्रण तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्व निर्माण झालेले आहेत विद्यार्थी डिजिटल जाण्याचा वापर करून आपले अध्यापन सुकर करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. दिनांक 4 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजय सावकार मंत्री वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सौ.अल्पा कोटेचा व श्रीमती कल्पना पाटील यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय कल्पना चव्हाण मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील डायट चे प्राचार्य अनिल झोपे डाएट अभिख्याता चंद्रकांत साळुंखे,जगन्नाथ दरंदले सर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व मान्यवर व सन्मानित केलेले शिक्षक उपस्थित होते.
त्याचप्रमाणे दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी तालुकास्तरावर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2024 स्पर्धेत चे बक्षीस वितरणाचे कार्यक्रम, व्यापारी भवन पाचोरा येथे आयोजित करण्यातआले, या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शिक्षण संस्था संचलित पंडितराव परसराम शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका
सौ अल्पा कोटेचा यांना गणित विषय गट (9,10वी ) व विज्ञान विषय (गट 6ते 8वी) ह्या दोघी विषयात शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत
प्रथम पारितोषिक ट्रॉफी व रोख रक्कम प्रदान करण्यात आले व
श्रीमती कल्पना पाटील यांना इंग्लिश विषयात (गट ९,१०)
प्रथम पारितोषिक ट्रॉफी व रोख रक्कम प्रदान करण्यात आले आहे. याप्रसंगी मंगेश देवरे मुख्य अधिकारी नगरपालिका,पाचोरा तसेच गोकुळ बेहेरे विकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा, श्रीमती सरोज गायकवाड व श्री समाधान पाटील गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पाडण्यात आला. गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.मा. तात्यासो पंडितराव शिंदे , उपाध्यक्ष .श्री. नीरजजी मुणोत, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे सचिव जे.डी. काटकर, शाळे चे मुख्याध्यापक, यांनी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.