पाचोऱ्यात समता सैनिक दलाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न; मान्यवरांची उपस्थिती

मधुर खान्देश वृत्तसेवा: दि. १८ एप्रिल रोजी पाचोरा येथे समता सैनिक दलाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याध्यक्ष धर्मभुषण बागुल यांच्या हस्ते करण्यात आले आहे. डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रखरतेने जपणूक करणाऱ्या आणि सामाजिक समतेसाठी सतत झगडणाऱ्या समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी हा एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण होता. पाचोरा तालुक्यात समता सैनिक दलाचे अधिकृत तालुका कार्यालय आता अखेर प्रत्यक्षात कार्यान्वित झाले. हे केवळ कार्यालय उघडण्याची बाब नाही, तर समतेच्या लढ्याला नवे अधिष्ठान, नवसंजीवनी देणारी घटना आहे. कारण तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पुरोगामी, समतेचे कार्यकर्ते, चळवळीत झिजलेले कार्यदूत, पत्रकार बांधव आणि समता सैनिक दलाच्या विचारांनी प्रेरित असंख्य लोकांनी हे कार्यालय असावे ही अनेक दिवसांपासून मागणी होती. आता ती मागणी पूर्ण होऊन एक नवा अध्याय सुरू होत आहे. समता सैनिक दल – एक ऐतिहासिक चळवळ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन आहे. संघटनेचा उद्देश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे. आज ही देशात आणि राज्यात विविध क्षेत्रांमध्ये असमानता, जातीभेद,अन्याय अशा गोष्टी दिसून येतात. अशा वेळी समता सैनिक दलाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.”असे विचार राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांनी व्यक्त केले करत हे विचार खेड्यापाड्यांत पोहोचावेत यासाठी या कार्यालयाचा उपयोग प्रशिक्षण केंद्र, संवाद मंच, माहिती केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष मा.किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले.