जळगाव जिल्हाताज्या बातम्या
भडगावच्या डॉ. जबी मिर्झा यांचे एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण!

मधुर खान्देश वृत्तसेवा : भडगाव शहरातील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या युवकाने वैद्यकीय शिक्षण घेतल्याबाबत त्यांचे समाजात सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. या शैक्षणिक प्रवासात त्यांचे वडील, श्री. मुकीम बेग हकीम बेग मिर्झा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. मिर्झा कुटुंबातील जबी यांच्यावर विविध राजकीय, सामाजिक मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून आला आहे.