नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात इसमाची चिट्टी लिहून आत्महत्या! पोलिसांकडून तत्काळ संशयित आरोपीस अटक


Advertisements
Ad 4

पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवासी असलेले विनोद सुकदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरंगी गावातील मयत मनोज पाटील यांच्या विरुद्ध फिर्याद पाचोरा पोलिसात दाखल करण्यात आली होती म्हणून नैराश्यातून आत्महत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशनला कुरंगी गावातील एकमेकांच्या विरोधात तक्रारीवरून फिर्यादि दाखल करण्यात आल्या होत्या तेव्हा पासुन मनोज हा नेहमीच नैराश्या मध्ये रहायचा. त्याबाबतीत पाटील यांच्या घरच्या मंडळींनी त्यास वेळोवेळी विचारणा केली असता त्याने सांगितले की, दिपक आनंदा (मोरे) पाटील हा मी एकटा असतांना मला धमकी दयायचा की,माझ्यावर केलेली केस माघार घेतली नाही तर मी तुला सोडणार नाही व तुझ्या परिवाराला देखील आणखीन त्रास देईल असे मनोज घरच्यांना सांगत असल्याची माहिती फिर्यादी यांनी पाचोरा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.  मयतास धमकी दिल्याने आरोपीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणुन त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने तत्काळ पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली  मनोजने फवारणीचे औषध पिवून घेतले. त्यात मनोजचा मृत्यू झाला. याबाबत संशयित दीपक आनंदा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीस डीबीचे राहुल शिंपी यांनी तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button