पाचोरा येथील व्हि.टी.जोशींचा सत्कार सन्मान;अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती

पाचोरा :अनेक क्षेत्रात योगदान आणि मार्गदर्शक पाचोरा तालुका सह शिक्षण संस्थेचे व्हि.टी. जोशी यांच्या पंच्याहत्तरी निमित्त ज्ञानामृत कार्यक्रम विधीमंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेत तर जळगांव क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ.विजय माहेश्वरी, नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, संस्थेचे अध्यक्ष माजी आ. दिलीप वाघ, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील,चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख , संचालक डॉ.जयवंत पाटील, खलील देशमुख, दुष्यंत रावळ आदींच्या उपस्थितीत पार पडला .कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे दिवंगत शिल्पकार यांचे प्रतिमापूजन, काश्मीर पहेलगाम येथे अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार झालेले भारतीय नागरिकांना श्रद्धांजली आणि स्वागत गीताने करण्यात आली. मा. आ.,अध्यक्ष दिलीप वाघ यांनी सत्कारार्थी व्ही. टी. नाना जोशी यांचा अमृत महोत्सव हा संस्थेचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. त्यांचा गौरव ग्रंथ भावी पिढीसाठी प्रेरणा देणारा आहे. व्हि .टी. नाना संस्थेला मार्गदर्शन करून अडीअडचणी सोडवितात. व्ही.टी. नाना जोशी यांची शैक्षणिक गुणवत्ता व बौद्धिक क्षमता अफाट असून सर्वच क्षेत्रातील अनुभव पाहता समाजाला त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची गरज असल्याचे आ .सत्यजित तांबे म्हणाले. कार्य करतांना एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असावी, शिक्षण महत्वाचे साधन असून शिक्षणात सामाजिक विषमता दुर करण्याची शक्ती आहे व्ही.टी.जोशी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की ,पन्नास वर्षांपासून अनेक क्षेत्रात कामं करतांना मला अनेक अनुभव आले. संस्थेत लिपीक पदा पासून अनेक पदांवर काम केले आहे. आजच्या विद्यार्थी पिढीला काय अपेक्षित आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतले पाहिजे.तेव्हाच संस्था चालवणे शक्य आहे. राज्यविधी मंडळाचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी अध्यक्षीय भाषणातून म्हणाले की, जे दुसऱ्यांना अमृत देतात त्या व्यक्तीचा हा सन्मान आहे. संस्कृती आणि शिक्षणाचे जवळचे नाते आहे. शिक्षणाच्या माध्यमातून करुणा जोपासून पुढे जावे.
या प्रसंगी महाविद्यालय प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक , प्राध्यापिका, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी एन चौधरी. महेश कोंडीन्य, आभार प्रा. वासुदेव वले यांनी मानले.