नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा नगरपरिषद संचलित महात्मा गांधी सार्वजनीक वाचनालयाच्या ई-लायब्ररी कक्षाचे आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उदघाटन.


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा नगरपरिषद संचलित महात्मा गांधी सार्वजनीक वाचनालय हे नुकतेच नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य वास्तूमध्ये स्थलांतरीत केले आहे. वाचनालयाची भव्य वास्तूने शहराच्या सौदर्यात भर घातलेली आहे. त्यात शहरातील विद्यार्थ्यांना आणखी एक मोलाची भेट नगरपालिकेने दिलेली असून दिनांक 01 मे 2025 रोजी असलेल्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आधूनिक अशा ई-लायब्ररीचे उदघाटन करण्यात आले आहे.
याचाच एक भाग म्हणून मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी अंतर्गत देशातील अग्रगण्य स्पर्धा परिक्षा करीता तयारी करुन घेणाऱ्या नामांकित संस्थांच्या वक्त्यांची लेक्चर उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक करतांना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगीतले की, मुख्याधिकारी हे नेहमीच नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असून त्यांनी ई-लायब्ररी सारखा उपक्रम नगरपालिकेच्या वाचनालयात आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठया शहरात न जाता गावात राहून नामांकित स्पर्धा परिक्षा केंद्रांची अभ्यासाची भाषणे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिल्याने त्यांची गैरसोय टळून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे.
सदरच्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय गोहील, भाजपाचे मधुभाऊ काटे, तहसिलदार विजय बनसोडे, ना. तहसिलदार कुमावत, ना. तहसिलदार रणजीत पाटील, ना. तहसिलदार मोरे, सामाजीक कार्यकर्ते सुनिल पाटील, प्रविण भाऊ ब्राम्हणे, बंडूभाऊ सोनार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, अभियंता भैय्यासाहेब पाटील, कार्य.अधिक्षक चैतन्य राऊत, संगणक अभियंता मंगेश माने, विद्युत अभियंता योगेश रेवेकर, प्रशासन विभागातील प्रसाद पटारे, शशिकांत भालेराव, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, पा.पु.अभियंता श्रुतीका धात्रक आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.ग्रंथपाल शाम ढवळे, गजानन पाटील यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन ललित सोनार तर आभार सहा.ग्रंथपाल शाम ढवळे यांनी मानले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button