जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात रवीकिरण महाराजांचे कीर्तन! पोलिस लक्ष्मण पाटील यांच्या पारिवारिक कार्यक्रमास उपस्थिती बाबत आवाहन.

पाचोरा येथे दि. ०३ मे २०२५ शनिवारी रोजी रात्री ८ वाजता अरुण मोतीराम पाटील त्यांच्या धर्मपत्नी सौ. सरुबाई अरुण पाटील यांनी नुकतीच काशी, चारधाम यात्रेचा प्रवास पूर्ण झाला असून त्याचा सत्कार तसेच जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दोंडाईचा येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे जाहीर किर्तन होणार आहे. या जाहिर किर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी रात्री ८ वाजता भडगाव रस्त्यावरील शिवनेरी नगर, महादेव मंदिराजवळ कैलामाता मंदिराच्या पाठीमागे उपस्थित राहावे असे आवाहन श्री. निंबा मोतीराम पाटील, श्री. रंगराव मोतीराम पाटील, श्री. अरूण मोतीराम पाटील, प्रा. श्री. वाल्मिक अरूण पाटील, श्री. पोलिस कर्मचारी असलेले लक्ष्मण अरूण पाटील यांनी केले आहे.