पाचोरा:पारधाडे गावातून अवैध वाळू वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर जप्तउपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशावरून कारवाई

पाचोरा, १९ मे – मौजे परधडे (ता. पाचोरा) येथे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशाने तसेच तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने महसूल पथकाने धडक कारवाई करत ४ ट्रॅक्टर वाळूसह जप्त केले. या ट्रॅक्टरना पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. ही कारवाई रविवार, १९ मे रोजी पहाटेच्या सुमारास मंडळ अधिकारी पाचोरा आर. डी. पाटील व ग्रामसभा अधिकारी लासगाव दीपक दवंगे हे सकाळी गोपनीय माहितीच्या आधारे रस्त्याला लपले. लगेच परधाडे गावाच्या दिशेने दोन-तीन ट्रॅक्टर येतांनी दिसले लगेच त्यांनी ते ट्रॅक्टर अडवले व त्यांना थांबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. संबंधित ट्रॅक्टर चालकांकडे वाळू उपसा किंवा वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे सर्व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या कारवाईत पुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता – मंडळ अधिकारी पाचोरा – आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी गाळण – डी. आर. पाटील, मंडळ अधिकारी पिंपळगाव _ डहाके भाऊसाहेब, ग्राम महसूल अधिकारी – दीपक दवंगे, आशिष काकडे, अतुल देवरे, ज्योती पाटील सागर मोरे
प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकारी अहिरे व तहसीलदार बनसोडे यांनी यापुढे देखील अशा अवैध कृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.