नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या

जळगाव:भडगाव: शारदा बागुल खून प्रकरणी ६ जून रोजी आक्रोश मोर्चा!


Advertisements
Ad 4

भडगाव, दि. ५ जून २०२५: भडगाव तालुक्यातील कै. शारदा उर्फ पूजा बागुल (माळी) यांच्या क्रूर खुनाच्या निषेधार्थ उद्या, शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भडगाव येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ मे २०२५ रोजी शारदा यांचा पती, नणंद, सासू, सासरे आणि इतर संशयितांनी धुळे येथे अमानुष मारहाण करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. या अमानवीय कृत्याविरोधात संतापलेल्या भडगावकरांनी एकत्र येऊन हा आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा भडगाव नगरपरिषदेजवळील बाजार चौकापासून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे. शारदा यांना त्वरित न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी समस्त भडगावकरांना कुटुंबासह मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून, समाजातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा कृत्यांविरुद्ध एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार भडगावकरांनी व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शारदा यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button