पाचोरा: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दसरा मैदान येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून वृक्षरोपण

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. ५ जून २०२५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचोरा नगर परिषदेच्या वतीने AMRUT आणि NULM कृतिसंघम कार्यक्रमा अंतर्गत शहरातील दसरा मैदान सिंधी कॉलनी येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या वृक्षरोपण कार्यक्रमात दुर्गेश सोनवणे, दगडू मराठे, भय्यासाहेब पाटील, महेश वडवाल, अर्जुन भोळे, चेतन राऊत, योगेश रेवेकर, प्रसाद पठारे, तुषार नकवाल, श्रुतिका धात्रक, प्रकाश गोसावी, कुणाल तायडे यांच्यासह CRP आणि महिला बचत गटाच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण आणि हरित शहराच्या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी याप्रसंगी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करतांना सर्वांना अधिकाधिक वृक्ष लावण्याचे आणि त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाने पाचोरा शहरात पर्यावरण जागृतीला प्रोत्साहन मिळाले असून, अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू राहणार असल्याचे नगर परिषदेने सांगितले. यावेळी शिवसैनिक रवी केसवाणी यांच्यासह माजी नगरसेवक बापू हटकर,विनोद ललवाणी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.