जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तहसील कार्यालयात गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

पाचोरा, दि. 6 जून 2025: आज सकाळी 6 वाजता मौजे बांबरुड राणीचे येथे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिजाची बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले आहे. सदर कारवाई पथक प्रमुख विनोद कुमावत, नायब तहसीलदार सुधाकर पाटील, मंडळ अधिकारी भरत ननवरे, नकुल काळकर, निखिल बळी, अतुल पाटील, लहू कोळेकर आणि प्रदीप काळे यांनी संयुक्तपणे केली असून पकडलेले ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.