जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे प्रांताधिकाऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

पाचोरा, दि. ११ जून २०२५ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रांताधिकारी, पाचोरा यांनी दिले आहेत. यामुळे शहरात झाडांची पडझड, विद्युत पुरवठा खंडित होणे आणि रेल्वे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी अशा घटना घडल्या होत्या तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडाली असून हायववेरील हॉटेल व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले आहे.
प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, स्थानिक प्रशासकीय कर्मचारी तात्काळ नुकसानीचे पंचनामे पूर्ण करतील. यासाठी पाचोरा नगरपालिका आणि तहसील प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. नुकसानीचे अहवाल तयार करून पुढील उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलली जाणार असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.