नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील विविध समस्यांबाबत नागरिकांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट! तात्काळ कॉल अन् समस्या मार्गी


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. १७ जून २०२५: पाचोरा शहरातील विविध समस्यांबाबत आज स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पाचोरा-जामनेर रोडवरील नालीच्या पाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, कृष्णापुरी परिसरातील अपूर्ण मुतारीचे काम, तसेच अन्य प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा झाली.

पाचोरा-जामनेर रोडवर नालीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे, याकडे नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच, कृष्णापुरी नदीपासून भारत डेअरी बस स्टॉपपर्यंत असलेल्या दहा चेंबरांची उंची वाढवण्याची मागणी केली. याशिवाय, कृष्णापुरी भागातील मुतारीचे काम बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण असल्याने होणाऱ्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. देवी मंदिरामागे पडलेले उर्वरित मटेरियल तातडीने उचलण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली.

या भेटीवेळी शरद गिते, विनोद पाटील, संदीप मराठे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी सर्व समस्यांची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांची गैरसोय आणि समस्या लक्षात घेता पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी आदेश देऊन तात्काळ अपघात होऊ नये म्हणून कृष्णापुरी देवी मंदिराजवळ पडलेली वाळू तात्काळ उचलण्यात आली आहे.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button