पाचोऱ्यात बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे किटचे वाटप;आ.किशोर पाटील यांची उपस्थिती

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. १७ जून २०२५: शहरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी, भडगाव रोड येथे आज सकाळी १० वाजता बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला असून शिवसैनिक बंडू केशव सोनार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात १५० बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी, युवानेता सुमित दादा किशोर पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, प्रविण ब्राह्मणे, योगेश पाथरवाट, दिलीप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन हर्षल सुनील, दामोदर कुणाल, मंगल धनगर, मनीष प्रभूलाल भोई, राज सोमवंशी आणि सागर बंडू सोनार यांनी यशस्वीपणे पार पाडले. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले असून वरखेडी येथे जावे लागत होते परंतु प्रभागातच भांड्यांचे किट मिळाले अशी प्रतिक्रिया बांधकाम मजुरांनी दिली आहे.