पाचोरा शिवसेना शहर प्रमुखपदी भोजराज (भोला) चतरू पाटील यांची निवड

पाचोरा, दि. 20 मे 2025: पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालय येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कृष्णापुरी भागातील रहिवासी आणि युवा सेनेचे कार्यकर्ते भोजराज (भोला) चतुरू पाटील यांची शिवसेना पक्षाच्या शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून भोजराज पाटील यांचे कार्यक्षेत्र प्रभाग क्रमांक 8 ते 12 असून याबाबतचे नियुक्तीपत्र पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर आप्पा बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील, माजी तालुकाप्रमुख सुनील पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भोजराज पाटील यांच्या या निवडीमुळे पाचोरा शहरातील शिवसेनेच्या कार्याला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.